www.24taas.com, झी मीडिया, मथुराअभिनेत्री हेमा मालिलीनी मथुरामधून निवडून आल्या आहेत, त्या आता मतदारसंघात फिरकणार नाहीत, असं कुणी म्हणत असेल, तर ते चुकीचं आहे.
कारण हेमा मालिनी यांनी म्हटलंय की, मी सुंदर सुंदर साड्या घालून फोटो काढायला नाही, तर प्रत्यक्षात मतदारसंघात विकासाची कामं करण्यासाठी निवडून आले आहे.
हेमा मालिनी यांना यापूर्वी राज्यसभेच्या खासदारकीचा अनुभव आहे. महिलांच्या सुरक्षेवर हेमा मालिनी विशेष भर देणार आहेत.
मथुरात राहून कामं करत राहणं हेमा मालिनींसाठी तसं सोप नाही, पण निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघात फिरकत नाहीत, अशी टीका करण्याची संधी त्यांना विरोधकांना अजिबात द्यायची नाहीय, असं त्यांनी सांगितलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 21, 2014, 21:39