www.24taas.com, झी मीडिया, बरेलीउत्तर प्रदेशातील बरेलीत एका तरूणाने जाळून घेतलं आहे. हरी सिंह असं या तरूणाचं नाव आहे. हा तरूण 25 वर्षांचा होता, त्याच्या जवळ ओळखपत्रही होते.
मात्र त्याचं नाव मतदार यादीत नव्हतं, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्याला मत देण्यापासून रोखलं. मद्याच्या नशेत हरिसिहने संतापात स्वत:ला जाळून घेतलं आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंवला येथील देवचरा येथील एका कॉलेजमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर मद्यधुंद अवस्थेत आलेल्या हरि सिंहने गोंधळ सुरू केला होता.
तो एका विशिष्ट पक्षाला मत देण्यासाठी आग्रही होता. त्यासाठी तो चारवेळा रांगेतही उभा राहिला.
मात्र मतदार यादीतच त्याचे नाव नसल्याने कर्मचा-यांनी त्याला परत पाठवले. यामुळे संतापलेल्या हरि सिंहने मतदान केद्रांसमोरच स्वत:ला जाळून घेतले. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अखेर यात त्याचा मृत्यू झाला.
मतदान करता न आल्याने आपल्या पतीने जाळून घेतले, असे त्याच्या पत्नीने सांगितले. मात्र जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, हरि सिंह याचे पत्नीशी भांडण झाले आणि कौटुंबिक वादामुळे निराश झालेल्या हरि सिंहने आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 17, 2014, 18:38