www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्लीप्रचंड मोठ्या विजयानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी हा विजय ऐतिहासिक आणि शानदार असल्याचं म्हटलं आहे, तसेच आम्हाला मिळालेला जनादेश हा परिवर्तनासाठी आहे.
सरकार एनडीएचं असेल आणि सोबत जे मित्र पक्ष आहे ते कायम राहतील, तसेच पंतप्रधान आपलं मंत्रिमंडळ स्वत: निवडतील, असं राजनाथ सिंह यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
राजनाथ सिंह पुढे बोलतांना म्हणाले, 1984 नंतर पहिल्यांदा एका पक्षाला बहुमत मिळालं आहे, देशभरात कमळ फुललंय.
आमची विश्वसनीयता आम्ही कायम टीकवून ठेऊ, समाजातील सर्व स्तरांचा विकास करणे हा आमचा उद्देश आहे. मी कार्यकर्त्यांना तसेच विरोधी पक्षातील सदस्यांना विजयाच्या शुभेच्छा देतो, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 16, 2014, 15:48