www.24taas.com, झी मीडिया, पाटणाजीतन राम मांझी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. राज्यपालांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना नितीश कुमार यांनी सांगितलं, आताच आम्ही महामहिम राष्ट्रपतींना भेटून आलो आहोत, आम्ही आमचा सरकार बनवण्याचा दावा सादर केला आहे.
आमच्यासोबत सीपीआयचे दोन आणि दोन अपक्ष आमदार आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
नितिश कुमार यांच्या माहितीनुसार, आम्हाला संपूर्ण बहुमत आहे, माजी मुख्यमंत्री मांझी यांचं कौतुक करतांना नितिश म्हणाले, मांझी यांना चांगला अनुभव आहे, त्यांचं योगदानही मोठं आहे.
मांझी या गया लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला, ते तिसऱ्या नंबरवर होतें. एका यांच्या रूपाने दलित मुख्यमंत्री राज्याला देण्याचा नितिश यांचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 19, 2014, 23:23