www.24taas.com, झी मीडिया, मुंबईनरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ छोटसं असणार आहे. नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ जम्बो असेल की लहान, यावर मागील काही दिवसांपासून चर्चा होत होती.
नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ट्वीट केलं आहे तसेच गुजरात भवनातून एक प्रेसनोट पाठवण्यात आली आहे. यात आपल्या मंत्रिमंडळाचा लहान असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रेस नोटमध्ये नरेंद्र मोदी यांचा जोर चतुर प्रशासनावर असणार आहे, सरकार वरच्या स्तरावर कपात करून, प्रत्यक्ष विकासावर भर देणार आहे.
संबंधित पण वेगवेगळ्या असलेल्या विभागांमध्ये समन्वय रहावा, म्हणून त्या सर्व विभागांचं मिळून एकच मंत्रालय बनवण्यात आलं आहे. हा बदल करण्यात आल्याने प्रशासन आणि कामाच्या पद्धतीत मोठा बदल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रेस नोटमध्ये म्हटलंय, याआधी अनेक पक्षांचं मिळून सरकार होतं, राजकीय अस्थिरता होती. एकाच मंत्रालयाचे विभाग वेगवेगळ्या पद्धतीने वाटले जात होते.
एक कॅबिनेट मंत्री अशा अनेक मंत्रालयांना पाहाणार आहे, ज्यात एकाच प्रकारचे अनेक क्षेत्र आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 26, 2014, 07:55