फोर्ब्सच्या २०१३ सालच्या जगातील सर्वात जास्त शक्तीशाली महिलांच्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी २१व्या क्रमांकावर होत्या. त्यात राजकारणातील तिसऱ्या शक्तीशाली नेत्या. फोर्ब्सच्या जगातील १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत सोनिया गांधी नवव्या स्थानी होत्या.
सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ला इटलीच्या लुसियाना इथं मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सोनिया गांधी इंदिरा गांधींचा मुलगा राजीव गांधी यांच्या सोबत १९६८मध्ये झाला. त्यांच्या ऑटोबायोग्राफीनुसार कॅम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेत असतांना राजीव गांधींसोबत सोनियांची भेट झाली आणि तिथंच प्रेम.
सोनिया गांधी यांचा राजकारणातला प्रवेश हा महत्वाकांक्षे पेक्षा परिस्थिती आणि शोकांतिकेतून झाला. सासू इंदिरा गांधींच्या हत्येच्या साक्षीदार असलेल्या सोनियांनी नवरा राजीव गांधी यांच्या राजकारणातल्या प्रवेशाला विरोध केला होता. पण राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधींना काँग्रेसची कमान सांभाळावीच लागली.
काँग्रेस अध्यक्षा म्हणून १५ वर्ष पूर्ण करणाऱ्या सोनिया गांधींनी पती राजीव गांधींच्या हत्येचा होत असलेल्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्याकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र मार्च १९९८मध्ये स्वीकारली.
१९९८मध्ये काँग्रेस पक्ष अतिशय वाईट परिस्थितून जात होता. सर्व कार्यकर्ते हताश आणि निराशेत होते. अशातच सोनिया गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. एप्रिल १९९९मध्ये सोनिया गांधींनी अण्णा द्रमुक (एआयएडीएमके)सोबत आघाडी केली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातल्या सरकारला अल्पमतात आणून आघाडीचं सरकार स्थापन केलं. तेव्हा २७२ खासदारांचा त्यांना पाठिंबा होता.
मग मात्र एखाद्या चमत्काराप्रमाणे काँग्रेस पक्ष पुढं आला. २००४मध्ये १५० जागा तर २००९च्या लोकसभा निवडणुकीत २०५ खासदारांसह त्यांनी सरकारची स्थापना केली. सोनिया गांधींना आघाडी सरकारच्या पंतप्रधान म्हणून बघितलं जात असतांनाच २००४मध्ये "माझ्या मनातला आवाज सांगतो की मी पंतप्रधानपदी बसू नय़े", असं सांगत सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाची माळ डॉ.मनमोहन सिंग यांच्या गळ्यात घातली. त्यावरुन सोनिया गांधी किती चांगल्या राजकारणी आहेत ते...
सोनियांनी आपल्या हाती काँग्रेसच्या चाव्या घेतल्यापासून तब्बल १० वर्ष आघाडीचं सरकार भारतीय संसदेत आहेत. सोनिया गांधी पक्षासाठी जमावाला आकर्षून घेणारी व्यक्ती ठरल्या.
मात्र गेल्या वर्षी तब्येतीच्या तक्रारींनंतर सोनिया गांधी यांनी आपली पक्षातील जबाबदारी मुलगा राहुल गांधीसोबत विभागून घेतली. राहुल गांधींना पक्षाचे उपाध्यक्ष केलं. आगामी काळात काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून राहुल गांधींनाच काम करावं लागणार हे त्यावरून दिसून येतंय.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची परिस्थिती असमाधानकारक असल्याचं दिसतंय. त्यामुळंच की आता सोनिया गांधींनी पुन्हा प्रचाराला सुरुवात केलीय. आता सोनिया गांधींचा जादू कितपत चालेल हा येणारा काळच सांगेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 19:48