उद्धव ठाकरे - बाळासाहेबानंतर दुसरा वाघ

उद्धव ठाकरे - बाळासाहेबानंतर दुसरा वाघ
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेची लोकसभा पहिलीच निवडणूक होत आहे. मात्र, असे असले तरी शिवसेनेची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. २००९ मध्ये शिवसेनाला जोरदार फटका बसला. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद भाजपकडे गेले. त्यामुळे लोकसभेनंतर आगामी विधानसभेतही शिवसेनेला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. शिवसेनेला पुनर्जीवित करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.


शिवसेनेला सध्या जोरदार फटका बसत आहे. अनेक जण शिवसेना सोडून जात आहेत. तसेच चुलत भाऊ राज ठाकरे यांची मनसेशी सामना करावा लागणार आहे. तर मराठा व्होट बॅंक या निवडणुकीसाठी महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ही व्होट बँक शिवसेनेकडे कि मनसेकडे जाणार यावर बरेच काही अवलंबून आहे. हाच शिवसेनेला मोठा धोका आहे.

मनसेशिवाय सध्या देशात नरेंद्र मोदी यांची हवा आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रातही लोकप्रिय होत आहे. मोंदीमुळे भाजपची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठी डोकेदुखी झाली आहे. तसेच घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये मोदी अर्थात एनडीएला कौल दिला गेला आहे. विरोधक १५ जागा जिंकतील. मात्र, राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आणि शिवसेनाविरोधात उमेदवार दिल्याने वातारवण तंग आहे.

वडील बाळासाहेब यांच्याप्रमाणे आक्रमकता कमी आणि संयमी नेतृत्व अशी ओळख उद्धव ठाकरे यांची आहे. तसेच राज ठाकरे यांच्या गाठीभेटीमुळे भाजपला निर्वाणीचा इशारा उद्धव यांनी दिला होता. त्यामुळे उद्धव राजकारणात साधे-भोळे नसल्याचे दिसून आले. त्यांनी यानिमित्ताने आपली चुणूक दाखवून दिली. शिवसेनेत बंडखोरीची लागन दिसून आली. काहींनी जय महाराष्ट्र केला. तरीही उद्धव आपल्या निर्णयावर ठार राहिले आहेत. त्यांनी नविन चेहऱ्यांना स्थान दिले आहे. त्यामुळे त्यांचा बदल चांगला मानला जात आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा आक्रमतेकडून संयमी अशी झाली आहे, हा एक लाभ शिवसेनेसाठी आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा दाखविण्याची क्षमता २०१४मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. त्यानंतर बाळासाहेब आणि उद्धव यांची तुलना केली जाईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 18:49
First Published: Friday, April 4, 2014, 18:49
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?