कोकणात राणे पराभूत, दीपक केसरकर किंगमेकर

कोकणात राणे पराभूत, दीपक केसरकर किंगमेकर
www.24taas.com,झी मीडिया, सिंधुदुर्ग

कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांना शह दिला. हा शह त्यांच्या कामी आल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयात केसरकर यांना महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे दीपक केसरकर हिरो झाले आहेत. त्यांनी किंगमेकरची भूमिका बजावली.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली ठसन लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिसून आली. सिंधुदुर्गात नीलेश राणे यांना मदत करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नकार दिला. याला बळ केसरकरांनी दिले. मी कार्यकर्त्यांसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तसेच राणेंचा दहशतवाद संपविण्यासाठी मी लढलो. त्यात यशस्वी झालोय. मात्र, हा विजय माझा नसून येथील दहशतीचा सामना करणाऱ्या जनतेचा आहे, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांची आणि पदाधिका-यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड सिंधुदुर्गात गेले होते. मात्र त्यांची शिष्टाईही असफल झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारां यांनी त्यांना खडसावले होते. तसेच नारायण राणे यांनी केसरकरांची कारर्कीद संपली असे भाष्य केले होते.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि केसरकरांना बजावून सुद्धा त्यांनी राणेंचा प्रचार करण्यास नकार दिला होता. आघाडी असताना बहिष्कार घालण्याची भूमिका योग्य़ नसल्याचं पवारांनी केसरकर यांना सुनावलंय होतं. तर केसरकर यांचे कौतुक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात केले होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 17:07
First Published: Friday, May 16, 2014, 17:07
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?