www.24taas.com, झी मीडिया, पाटणालालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांना नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची स्टाईल आवडते. लालू प्रसाद यादव यांच्याकडून सध्या नरेंद्र मोदी यांना कट्टर विरोध केला जात आहे.
मात्र पाटलीपूत्रहून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार मीसा भारती यांना नरेंद्र मोदी यांचं भाषण चांगलंच भावतं, असं त्यांनी मान्य केलं आहे.
मीसा भारती म्हणतात नरेंद्र मोदी यांचे विचार वेगळे आहेत. आमची आणि त्यांची विचारसरणी जुळत नसली तरी, त्याच्या भाषणाची स्टाईल अनोखी आहे.
नरेंद्र मोदींच्या तोडीचं भाषण करणारा नेता सध्या देशात नसल्याचं लालूंच्या कन्या मीसा भारती यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या भाषणाची स्टाईल बिहारसह अवघ्या देशात लोकप्रिय आहे.
लालू प्रसाद यादव आपल्या अनोख्या शैलीत भाषणा दरम्यान अनेकांची फिरकी घेतात, हे लोकांना चांगलंच भावतं, मात्र त्यांची मुलगी मीसा भारती यांना नरेंद्र मोदींच्या भाषणाची तऱ्हा आवडते हे विशेष.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 10, 2014, 08:37