राज्यात अंदाजे सरासरी 56 % तर मुंबईत 53 % मतदान

राज्यात अंदाजे सरासरी 56 % तर मुंबईत 53 % मतदान
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आज राज्यात तिस-या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय. राज्यात 19 तर देशभरात 117 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीय. राज्यात मुंबईसह ठाणे, कोकण आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आज मतदान होतंय. 19 मतदारसंघात 338 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई. ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड, नाशिक, दिंडोरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, औरंगाबाद आदी ठिकाणी आज मतदान होत आहे.

नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, रायगडमधून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, मुंबईतून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, नंदूरबारमधून माजी मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हीना गावित, रावेरमधून विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे, शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे, मुंबईतून अभिनेता महेश मांजरेकर यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे फार मोठी अग्निपरीक्षा बनली आहे.

LIVE : Polling

ठाणे जिल्हा 49.48 % @ 7.00 pm पर्यंत

1) पालघर 60 %
2) भिवंडी 45 %
3) कल्याण 41 %
4) ठाणे 53 %

@ 7.00 pm पर्यंत अंदाजे
1) नंदुरबार - 62 %
2) धुळे - 59 %
3) जळगाव - 56 %
4) रावेर - 58 %
5) जालना - 63 %
6) औरंगाबाद- 59 %
7) दिंडोरी - 64 %
8) नाशिक - 64 %
9) पालघर - 58 %
10) भिवंडी - 43 %
11) कल्याण - 43 %
12) ठाणे - 42 %
13) उत्तर मुंबई - 52 %
14) उत्तर पूर्व मुंबई- 50 %
15) उत्तर पश्चिम मुंबई - 52 %
16) उत्तर मध्य मुंबई - 53 %
17) दक्षिण मध्य मुंबई - 52 %
18) दक्षिण मुंबई - 55 %
19) रायगड - 64 %

सरासरी - 55.57 %


@ 6.00 pm पर्यंत

1) नंदूरबार - 62 %
2) धुळे - 61%
3) जळगाव - 56 %
4) रावेर - 58 %
5) जालना - 60 %
6) औरंगाबाद - 59 %
7) दिंडोरी - 64 %
8) नाशिक - 60 %
9) पालघर - 60 %
10) भिवंडी - 43 %
11) कल्याण - 42 %
12) ठाणे - 52 %
13) उत्तर मुंबई - 52 %
14) उत्तर पश्चिम मुंबई - 50 %
15) उत्तर पूर्व मुंबई- 53 %
16) उत्तर मध्य मुंबई - 55 %
17) दक्षिण मध्य मुंबई - 55 %
18) दक्षिण मुंबई - 54 %
19) रायगड - 64 %

6 वाजेपर्यंत राज्यात सरासरी अंदाजे 56 टक्के मतदान तर मुंबईत अंदाजे 53 टक्के मतदान

@ 5.00 pm पर्यंत

1) नंदूरबार - 54.50 %
2) धुळे - 50.86 %
3) औरंगाबाद - 51.9 %
4) जालना - 54.44 %
5) पालघर - 48.23 %
6) भिवंडी - 37.65 %
7) कल्याण - 35.68 %
8) ठाणे - 42.63 %
9) रायगड - 57 %
10) जळगाव - 42 %
11) उत्तर मुंबई - 49.37 %
12) उत्तर पश्चिम मुंबई - 46 %
13) उत्तर पूर्व मुंबई - 47. 50 %
14) उत्तर मध्य मुंबई - 47 %

@ 3.00 pm पर्यंत
1) नंदुरबार - 46.10 %
2) जालना - 41.80 %
3) औरंगाबाद - 34.88 %
4) पालघर - 30.25 %
5) भिवंडी - 25.28 %
6) कल्याण - 37.35 %
7) ठाणे - 26.25 %
8) उत्तर मुंबई - 40.07 %
9) उत्तर-पूर्व मुंबई - 35 %
10) उत्तर मध्य मुंबई - 36 %
11) धुळे - 39 %
12) दिेंडोरी - 45.19 %
13) नाशिक - 39.19 %
14) रायग़ड - 46 %
15) रावेर - 38.52 %
16) उत्तर पश्चिम मुंबई - 37.35 %
17) दक्षिण मुंबई - 29 %
18) दक्षिण मध्य मुंबई - 32.06 %
19) जळगाव - 36. 77 %

राज्यातील 3 वाजेपर्यंतचं सरासरी मतदान - 35.92 %


@ 1.30 pm
निवडणूक कर्मचाऱी वैशाली भाले यांना खोपट केंद्रावर चक्कर. पडल्याने त्यांचा मृत्यू

राज्यात 28.03 टक्के मतदान
@ 1.00 pmपर्यंत
- उत्तर मुंबई - 29.14 टक्के मतदान
- उत्तर-पश्चिम मुंबई - 25.05 टक्के मतदान
- उत्तर पूर्व मुंबई - 26.50 टक्के मतदान
- उत्तर मध्य मुंबई - 24 टक्के मतदान
- दक्षिण मध्य मुंबई - 27 टक्के मतदान
- दक्षिण मुंबई - 22.30 टक्के मतदान
- नंदूरबार - 35.50 टक्के मतदान
- धुळे - 30.5 टक्के मतदान
- जळगाव - 28 टक्के मतदान
- रावेर - 31 टक्के मतदान
- जालना - 32.24 टक्के मतदान
- दिंडोरी - 32 टक्के मतदान
- नाशिक - 34. 85 टक्के मतदान
- औरंगाबाद 32 टक्के मतदान
- पालघर - 26.2 टक्के मतदान
- भिवंडी - 31 टक्के मतदान
- कल्याण - 23.05 टक्के मतदान,
- ठाणे - 19.65 टक्के मतदान
- रायगड - 34 टक्के मतदान

राज्यात सरासरी 15 टक्के मतदान
@ 11.00 amपर्यंत
1) उत्तर पश्चिम मुंबई 16.7 टक्के मतदान
2) उत्तर पूर्व मुंबई 15.20 टक्के मतदान
3) दक्षिण मध्य मुंबई 18.50 टक्के मतदान
4) दक्षिण मुंबई - 13.20
5) उत्तर मध्य मुंबई 15.5 टक्के मतदान
6) उत्तर मुंबई 17.9 टक्के मतदान
7) जळगाव - 14.83 टक्के मतदान
8) रावेर - 18 टक्के मतदान
9) पालघर - 12 टक्के मतदान
10) ठाणे - 9.13 टक्के मतदान
11) कल्याण 11.5 टक्के मतदान
12) जालना - 16.17
13) औरंगाबाद - 13.69
14) दिंडोरी - 19
15) नाशिक - 18.40
16) भिवंडी - 10.25
17) रायगड - 19
18) धुळे - 17 टक्के मतदान
19) नंदुरबार - 20.60 टक्के मतदान

@ 10 am
चेंबूरमधील सुभाषनगर शाळेत सुरूवातीपासूनच मतदानयंत्र बंद

@ 9.45 am
ठाणे येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांनी केले मतदान

@ 9.00 amपर्यंत
राज्यात सरासरी 9.47 टक्के मतदान

- नंदुरबार - 9.53 टक्के मतदान
- धुळे - 8 टक्के मतदान
- जळगाव - 10.49 टक्के मतदान
- रावेर - 7.90 टक्के मतदान
- जालना - 10.49 टक्के मतदान
- औरंगाबाद - 10.20 टक्के मतदान
- दिंडोरी - 8 टक्के मतदान
- नाशिक - 8.30 टक्के मतदान
- पालघर - 6 टक्के मतदान
- भिवंडी - 7 टक्के मतदान
- कल्याण - 6.89 टक्के मतदान
- ठाणे - 6.12 टक्के मतदान
- रायगड - 9 टक्के मतदान

@ 9.00 am पर्यंत मुंबईत
- दक्षिण मध्य मुंबई 7 टक्के मतदान
- दक्षिण मुंबई 7.40 टक्के मतदान
- उत्तर मुंबई 9 टक्के मतदान
- उत्तर मध्य मुंबई 5 टक्के मतदान
- उत्तर पश्चिम मुंबई 7.99 टक्के मतदान
- उत्तर पूर्व मुंबई 7 टक्के मतदान

@ 9.00 amपर्यंत
- औरंगाबादमध्ये 11 टक्के मतदान
- नंदूरबारमध्ये 9 टक्के मतदान
- धुळ्यामध्ये 8 टक्के मतदान
- जळगाव 5 टक्के मतदान
- रावेर - 8 टक्के मतदान

@ 8.25am
अभिनेता अतुल कुलकर्णीचे मतदान यादीतून नाव गायब. मतदान करण्यापासून रोखण्यात आले.

@ 8.12 am
ठाण्यातील सेंट जॉर्ज शाळेत मतदान मशिन बंद पडले. मतदान थांबविण्यात आलेय.

@ 8.00 am
ठाण्यात कळव्यानंतर आणखी एका ठिकाणी मतदान मशिन बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा.

@ 8.00 am
कळव्यात नागरिक झालेत संतप्त

@ 7.50 am
ठाण्यातील कळव्यामध्ये एका केंद्रावर मशिन बंद पडल्याने या केंद्रावरील मतदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथे रांग वाढत असल्याचे दिसत आहे.

@ 7.20 am
घाटकोपर येथे मतदानासाठी मतदारांच्या रांगा.

@ 7.00 am
राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.

कोणी बजावला मतदानाचा हक्क

@ 10.15 am
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबासमवेत केले मतदान.

@ 10 am
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत केले मतदान

@ 10 am
मनसे उमेदवार आदित्य शिरोडकर यांनी केले मतदान...

@ 9.45 am
ठाणे येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांनी केले मतदान

@ 9.20 am
राहुल महाजन याने केले मतदान

@ 9.00 am
अभिनेता धमेंद्र यांनी केले मतदान

@ 8.40 am
अभिनेता अामिर खान यांने केले मतदान

@ 8.00 am
भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी बजावला आपला हक्क

@ 7.45 am
अभिनेत्री विद्या बालन हिने केले मतदान

@ 7.30 am
उत्तर मुंबईतून महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केले मतदान

@ 7.26 am
अभिनेता सुनील शेट्टी याने पेडर रोड येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

@ 7.20 am
- भाजप उमेदवार पुनम महाजन यांनी वरळी येथे केले मतदान

@ 7.15 am
- मुंबईतल्या कफ परेड भागामध्ये उद्योगपती अनिल अंबानी यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 24, 2014, 07:43
First Published: Friday, April 25, 2014, 08:49
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?