लोकसभा निवडणुकीत भाजपची स्टार पॉवर मैदानात

लोकसभा निवडणुकीत भाजपची स्टार पॉवर मैदानात
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं आपली स्टार पॉवर मैदानात उतरवलीय. माजी केंद्रीय मंत्री आणि चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांना पंजाबमधल्या गुरुदासपूरमधून उमेदवारी देण्यात आलीय.

अहमदाबाद पूर्वमधून लालकृष्ण अडवाणींचे खंदे समर्थक समजले जाणारे विद्यमान खासदार हरीन पाठक यांना डावलून परेश रावल यांना पक्षानं मैदानात उतरवलंय. पाटणा साहिबमधून बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघन्स सिन्हा उमेदवार आहेत.

ड्रीम गर्ल हेमा मालिनी मथुरातून निवडणूक लढवतायत. तर किरण खेर यांना चंदीगडधून पक्षानं तिकीट दिलंय. आपल्या रॉकींग संगीतानं एक काळ गाजवणारे बप्पी लहरी पश्चिम बंगालमधल्या सीरामपोरमधून भाजप आणि मोदींचा राग आळवणार आहेत.

ईशान्य दिल्लीतून भोजपूरी कलाकार मनोज तिवारींना पक्षानं उमेदवारी दिलीय. आता या स्टार पॉवरचा भाजपला किती उपयोग होतो तसंच यापैकी किती स्टार निवडणूक जिंकणार हे निकालाच्या दिवशीच कळेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 26, 2014, 10:59
First Published: Wednesday, March 26, 2014, 11:05
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?