लोकसभा निवडणूक : मोदी, केजरीवाल, अजय राय यांची कसोटी

लोकसभा निवडणूक : मोदी, केजरीवाल, अजय राय यांची कसोटी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली असून या टप्प्यात जवळपास ९ कोटी मतदार ६,०६० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. यामध्ये वाराणशीत भाजपाचे नरेंद्र मोदी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अजय राय यांची कसोटी आहे.

उत्तर प्रदेशच्या १८, पश्चिम बंगालच्या १७ व बिहारच्या ६ जागांसाठी मतदान होईल. मुलायमसिंह, जगदंबिका पाल, योगी आदित्यनाथ इत्यादी प्रमुख उमेदवार यासाठी रिंगणात आहेत. वाराणसीत आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मतदानाचा हक्क बजावला.

या ठिकाणी निवडणूक
-बिहार : वाल्मिकीनगर, पश्चिम चंपारण, पूर्वी चंपारण, वैशाली, गोपालगंज, सिवन या मतदार संघात एकूण 90 उमेदवार असून 8582 केंद्र आहेत. 9051952 एकूण मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

- उत्तर प्रदेश : डूमारियागंज, महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवारिया, बासगांव, लालगंज, आजमगढ, घोसी, सलामपूर, बलिया, जौनपूर, मछलीशहर, गाझियापूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, रॉबर्टगंज या मतदार संघात एकूण 328 उमेदवार असून 19881 मतदान केंद्र आहेत.

- पश्चिम बंगाल : बेहरामपूर, कृष्णनगर, रानाघाट, बानगाव, बैराकपूर, दम दम, बरासात, बसरिहात, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जाधवपूर, कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर, तामलुक, कांटाई, घाटल या मतदार संघात एकूण 188 उमेदवार असून 32000 केंद्र आहेत. तर 12247765 एकूण मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

या लढतीकडे लक्ष

- उत्तर प्रदेश : जौनपूर : अभिनेता रविकिशन (काँग्रेस),
- कुशीनगर : आर. पी. एन सिंग (काँग्रेस),
- डोमारीगंज : जगदंबिका पाल (भाजपा),
- बलिया : नीरज शेखर (सपा, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र),
- मिर्जापूर : सुप्रिया पटेल (अपना दल, भाजपा सहयोगी पक्षाच्या अध्यक्षा), - घोसी : मुख्तान अन्सारी (कौमी एकता दल, काँग्रेस सहयोगी पक्ष) विरुध्द अतुल कुमार अनजान (कम्युनिस्ट पक्ष),
- देवरिया : कलराज मिश्र (भाजपा), गोरखपूर : योगी आदित्यनाथ,
-गाझियापूर : विकास यादव (अपक्ष, बसपाचे माजी खासदार डी. पी. यादव यांचा मुलगा)
- बिहार : प. चंपारण : प्रकाश झा (संजद) विरुध्द रघुनाथ झा (राजद),
- वैशाली : रघुवंश प्रसाद सिंह (राजद) विरुध्द रामा सिंग (लोजप) विरुध्द विजय कुमार साहनी (संजद),
- सिवन : हेना शहाब (राजद, खा. मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या पत्नी)
- पश्चिम बंगाल : बारासात : पी. सी. सरकार ज्यूनियर (भाजपा, जादूगार) विरुध्द अधीर रंजन चौधरी (प्रदेश काँग्रेस अध्यक्ष) विरुध्द डॉ. मुर्तजा हुसेन (डावी आघाडी),
- जाधवपूर : सुगाता बोस (तृणमूल काँग्रेस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नात),
- बैरकपूर : दिनेश त्रिवेदी (तृणमूल काँग्रेस, माजी रेल्वे मंत्री) विरुध्द रमेश हांडा (भाजपा, माजी आयपीएस अधिकारी),
- दम दम : असीम दासगुप्ता (माकप, माजी अर्थमंत्री) विरुध्द तपन सिकदर (भाजपा, माजी केंद्रीय मंत्री) विरुध्द सौगत राय (तृणमूल काँग्रेस). - कोलकाता दक्षिण : संदीप बंदोपाध्याय (तृणमूल काँग्रेस, प्रदेश अध्यक्ष), - घाटल : दीपक अधिकारी-देव (तृणमूल काँग्रेस, अभिनेता), कृष्णानगर : तापस पॉल, (तृणमूल, अभिनेता),
- बराकपूर : अभिषेक बॅनर्जी (तृणमूल, ममता बॅनर्जी यांचे पुतणे ) विरुध्द सुभासिनी अली (माकपा नेत्या).

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 12, 2014, 07:53
First Published: Monday, May 12, 2014, 12:01
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?