या सेलिब्रेटींनीही मतदानाचा हक्क बजाविला

या सेलिब्रेटींनीही मतदानाचा हक्क बजाविला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मतदान करा, फरक पडतो, असं आवाहन करणाऱ्या सेलिब्रेटींनीही आजआपला मतदानाचा हक्क बजाविला. दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार, उद्योगपती अनिल अंबानी यांनी आज सकाळीच मतदान केले.

सेलिब्रिटींनी सकाळीच मतदान केंद्रांवर हजेरी लावली. मुंबईमध्ये बांद्रा येथे आमिर खान, रेखा, धर्मेंद्र, सनी देओल, राहुल बोस, मिलिंद सोमन, विद्या बालन, नेहा धुपिया, दिया मिर्झा, शिल्पा शेट्टी, सोनम कपूर यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांनी मतदान केले. तर रजनीकांत यांच्यासह कमल हसन यांनी चेन्नईमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते पार पाडले आहे. प्रत्येक भारतीयाने मतदान केले पाहिजे, असे अभिनेता आमिर खान यांने सांगितले. त्याच्यासोबत त्याची पत्नी किरण रावही होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने पत्नी अंजलीसह मतदानाचा हक्क बजावला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ




First Published: Thursday, April 24, 2014, 12:08
First Published: Thursday, April 24, 2014, 15:27
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?