करोडपती उमेदवाराची पत्नी विकते भाजीपाला

करोडपती उमेदवाराची पत्नी विकते भाजीपाला
www.24taas.com, झी मीडिया, हजारीबाग

लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र हजारीबाग मतदारसंघात 55 कोटी रूपये संपत्ती असलेले जयंत सिन्हा आणि 40 कोटी रूपयांची संपत्ती असलेली भाजपचे सौरव नारायण सिंह मैदानात आहेत,

त्याच्यासोबत ऑल झारखंड स्टुडंटस युनियन पार्टीचे उमेदवार लोकनाथ महतोही निवडणूक लढवत आहेत. महतो यांनी आपली संपत्ती दोन कोटी रूपये असल्याचं उमेदवारी अर्ज भरतांना नमूद केलं आहे.

लोकनाथ महतो यांच्या पत्नी आजही गावच्या बाजारात भाजीपाला विकण्याचं काम करतात, याबद्दल महतो यांच्या पत्नी मुलानी देवी विचारलं असता, आपण आपल्या पायावर उभे आहोत.

आपल्याला ते आवडतं आणि मी कोणत्या आमदाराची पत्नी असल्याने मी माझा व्यवसाय बंद का करावा, आणि मला यात आनंद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाधान आहे.

आपल्या शेतातून भाजीपाल आणल्यानंतर मुलानी देवी विकायला घेऊन जातात, त्या दररोज 200 रूपयांचा भाजीपाला विकतात. याशिवाय त्यांची दोन्ही मुले ही शेतातील कामांना हातभार लावतात.

आपल्या पतीचा प्रचार केला आहे काय?, यावर मुलानी देवी सांगतात, मी आपल्या गावात लोकनाथ महतो यांच्यासाठी मते मागितली आहेत. महतो यांच्या मते त्यांची पत्नी खूप साधी आहे, मुलानी देवी यांना आपली घराची कामं करायला आवडतात, असं त्यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 29, 2014, 21:49
First Published: Saturday, March 29, 2014, 23:32
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?