www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली लोकसभेच्या अखेरच्या नवव्या टप्प्यात 41 जागांसाठी मतदान आज पार पडलं. सोळाव्या लोकसभेचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही कुणाला कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे
शेवटच्या टप्प्यातील 5 पर्यंतची मतदानाची टक्केवारीबिहारमध्ये संध्याकाळी पाचपर्यंत 54 टक्के मतदान झालं, वाराणसीत संध्याकाळी 5 पर्यंत 53 टक्के मतदान झालं आहे.
उत्तर प्रदेशात संध्याकाळी पाचपर्यंत 55.29 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये यावेळीही रेकॉर्ड ब्रेक 79.03 टक्के मतदान झालं आहे. आझमगडमध्येही 57 टक्के मतदान झालंय.
लोकसभा निवडणुकीसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतील 41 लोकसभा मतदारसंघात आज मतदानाचा फुल अँड फायनल टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंग यादव, कलराज मिश्र, जगदंबिका पाल, प्रकाश झा अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.
या मतदानानंतर 16 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आता संपुष्टात आलीय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह यच्चयावत नेत्यांनी या रणधुमाळीत सहभाग घेतला.
जाहीर सभा, रोड शो, पदयात्रा या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढले. एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे यंदाची ही निवडणूक गाजली. विकासाच्या मुद्यावरून जातीपातीच्या राजकारणापर्यंत प्रचाराची पातळी घसरल्याचं चित्र यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. मात्र आता प्रचाराचा धुरळा खाली बसला असून, आज होणा-या अंतिम मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
LIVE: लोकसभा निवडणुकीचा नववा आणि अंतिम टप्पा@2.20- pmमाजी क्रिकेटर सौरभ गांगुलीने केले मतदान
@2.00- pmअनेकांची नावे मतदार यादीत नसल्याने वाराणसीत मतदान केंद्राबाहेर गोंधळ
दुपारपर्यंतचे अपडेटबिहारमध्ये दुपारी 2 पर्यंत 43 टक्के मतदान
उत्तर प्रदेशात दुपारी 1 पर्यंत 36 टक्के मतदान
उत्तर प्रदेशातील जोनपूरमध्ये अभिनेता रवी किशनचं मतदान
@1.00 pmपर्यंत आकडेवाडी-बिहार - 38 टक्के मतदान
-उत्तर प्रदेश - 37 टक्के मतदान
-पश्चिम बंगाल - 56.3 8टक्के मतदान
@12.00 pmपर्यंत आकडेवाडी-बिहार - 31 टक्के मतदान
@11.00 amपर्यंत आकडेवाडी-उत्तर प्रदेश - 12 टक्के मतदान
-बिहार - 21.17 टक्के मतदान
-पश्चिम बंगाल - 26.73 टक्के मतदान
- वाराणसी - 20 टक्के मतदान
@11.15 amपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरवित आहेत. याकडे निवडणूक आयोगाचे लक्ष नाही, अशी टीका कम्युनिष्ट नेते सिताराम येचुरी यांनी आहे. ते तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलेल्या हाणामारीबाबत बोलत होते.
@11.00 amपश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी अनेक जण जखमी झालेत. महिलांनाही धक्काबुकी झाली.
मतदान टक्केवारी @ 9 am- उत्तर प्रदेश - 12 %
- वाराणसी - 10 %
- देवरिया - 12 %
- आझमगड - 8 %
- बिहार - 10.93 %
- पश्चिम बंगाल - 21.15
@10.19 amमुरली मनोहर जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क
@9.23 amतृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ( टीएमसी) मून मून सेन कोलकाता येथे आपल्या मुलींसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी रिया आणि रायमा सेन उपस्थित होत्या.
@8.00 amलोकसभा निवडणूक 2014 च्या शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरू झालंय. नरेंद्र मोदी यांनी विशेषत: तरुणवर्गाला मतदानाचे आवाहन केलंय. ते म्हणालेत, माझं आवाहन आहे की त्यांनी मतदान करावे. त्याचबरोबर तरुणांनी स्वत:च नाही तर आपलं कुटुंब, मित्रांनाही मतदान करण्यासाठी घेऊन जावं, नरेंद्र मोदींनी ट्विट केलंय.
@7.45 amउत्तर प्रदेशमध्ये एका केंद्रावर लॅपटॉपवर मुलायसिंग आणि अखिलेश यांचा फोटो
@7.45 amअरविंद केजरीवाल म्हणतात, मीच जिंकणार
@7.40 amबिहारमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद, मतदान केंद्रावर रांगा
@7.20 amगोरखपूरमधील भाजप उमेदवार योगी आदित्यनाथ यांनी आपला मतदाना हक्क बजावला. त्यांची लढत ही समाजवादी पार्टीच्या राजमाती निशाद यांच्याशी असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदींची लाट आहे. आणि युपीमध्ये भाजपच बाजी मारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलंय.
@7.14 amवाराणसीतील काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनी मतदान केलं. अजय राय यांचा मुकाबला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल अशी तिरंगी लढत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 12, 2014, 08:39