LIVE -निकाल माढा

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  माढा
www.24taas.com, झी मीडिया, माढा

सकाळी 4:55 वाजता अपडेट माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील २९,००० मतांनी विजयी

सकाळी 2:48 वाजता अपडेट माढ्यातून सदाभाऊ खोत 14 मतांनी आघाडीवर

सकाळी 10:45 वाजता अपडेट माढ्यात सदाभाऊ खोत 9000 मतांनी आघाडीवर

सकाळी 9:50 वाजता अपडेट माढा विजय मोहिते पाटील तिसऱ्या फेरीनंतर 12 हजार मतांनी आघाडीवर

सकाळी 9:03 वाजता अपडेटमाढ्यातून सदाभाऊ खोत 1900 मतांनी आघाडीवर, विजय सिंह मोहिती पाटील पिछाडीवर

सकाळी 8:52 वाजता अपडेट
माढ्यातून सदाभाऊ खोत आघाडीवर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  माढा

मतदारसंघ : माढा

मतदान दिनांक : 17 एप्रिल

एकूण मतदान : ६२ टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी)
महायुती – सदाभाऊ खोत
आप – सविता शिंदे
बसपा - कुंदन बनसोडे

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
शरद पवार - राष्ट्रवादी काँग्रेस – 5,30,596 मतं - 57.71%
सुभाष देशमुख – भाजप – 2,16,137 मतं - 23.51%
महादेव जाणकर - राष्ट्रीय समाज पक्ष – 98,946 मतं - 10.76%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 15,58,442
पुरुष : 8,03,949
महिला : 7,54,493

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 शरद पवारांचा गड राखण्याचं आव्हान शंकरराव यांच्यासमोर असेल.

 माढा लोकसभा मतदारसंघाचा कायापालट होईल म्हणून मतदारांनी शरद पवार यांना मोठय़ा उमेदीने निवडून देताना त्यांचा अभिमान बाळगला होता. प्रत्यक्षात त्यांच्याकडून भरीव असा विकास न झाल्याने सार्वत्रिक स्वरूपात निराशाच दिसून येते.

 करमाळा भागात दूध प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. हे आश्वासन कृतीत उतरले नाही. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर म्हैसाळ योजनेचा शुभारंभ थाटात झाला खरा; परंतु या योजनेचे पाणी सांगोल्याच्या कोरडा नदीत गेल्या ३० मार्च रोजी सोडले आणि २१ एप्रिल रोजी बंद झाले.

 टेंभू योजनेचे पाणी मार्चअखेर मिळेल व गुढी पाडव्याची आंघोळ याच टेंभू योजनेच्या पाण्याने होईल, अशी आशा सांगोलेकर बाळगून आहेत. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने ठोस योजना आखण्याची अपेक्षा होती. त्यादिशेने वाटचालही होऊ शकली नाही.

 त्याचवेळी माढा मतदारसंघात गटा-तटाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध न राहता त्यात दुफळी माजली आहे.

 एकंदरीत, राष्ट्रवादीबद्दल नकारात्मक परिस्थिती दिसून येते. त्यास पर्याय म्हणून आता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढे येत असल्याचे बोलले जाते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 18:03
First Published: Friday, May 16, 2014, 21:34
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?