LIVE -निकाल रावेर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  रावेर
www.24taas.com, झी मीडिया, रावेर


दुपारी १.०० वाजता अपडेट
Ø रावेर - भाजपच्या रक्षा खडसे यांनी १ लाख ५० हजार मतांनी विजय

भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आघाडीवर
<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  रावेर



मतदारसंघ : रावेर

मतदान दिनांक : २४ एप्रिल

एकूण मतदान : 58 टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – मनिष जैन (राष्ट्रवादी)
महायुती – रक्षा खडसे (भाजप)
भारिप बहुजन महासंघ - प्रतिभा शिंदे

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
हरिभाऊ जावळे - भाजप – ३,२८,८४३ मतं – ४५.६७%
रविंद्र पाटील – राष्ट्रवादी – ३,००,६२५ मतं – ४१.७५%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १४,१८,६९१
पुरुष : ७,३५,४८७
महिला : ६,८३,२०४

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...

 रावेर स्वत:कडे ठेवून जळगाव काँग्रेसला सोडण्याची राष्ट्रवादीची योजना असली तरी काँग्रेसाचाही रावेर मतदारसंघावर डोळा आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेपूर्वी सध्याचा रावेर मतदारसंघाचा बहुतांशी भाग एरंडोल मतदारसंघात होता.

 भाजपचे एम. के. अण्णा पाटील प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेताना पकडले गेल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे वसंत मोरे निवडून आले.

 या वेळी जळगाव घरकूल योजना घोटाळ्यातील आरोपी व माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीमध्ये घाटत आहे. देवकर यांचा लाल दिवा कायम ठेवण्यात आला असता तर त्यांना लोकसभा लढविण्याकरिता ताकद मिळाली असती.

 पण देवकर यांचे राज्यमंत्रीपद काढून घेण्यात आले.

मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
 केळी या प्रमुख पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग आणि प्रकल्प नाही.

 फैजपुरचा मधुकर सहकारी कारखाना वगळता, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, या ठिकाणी असलेले साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे.

 केळी उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीत ठोस शासकीय मदत नाही

 तापी नदीतून दरवर्षी पावसाळ्यात २६३ T.M.C पाणी गुजरातमधील उकाई धरणात पर्यायाने समुद्रात वाहून जाते हे पाणी रोखण्यासाठी नवीन एकही मोठा सिंचन प्रकल्प झाला नाही.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 18:37
First Published: Friday, May 16, 2014, 21:47
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?