'महायुतीला राज्यात ३४ जागा मिळतील'

`महायुतीला राज्यात ३४ जागा मिळतील`

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महायुतीला राज्यात ३४ पेक्षा जास्त जागा मिळतील, असं भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच आपण भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे आदेशही दिले असल्याचं मुंडेंनी म्हटलंय.

आपण लोकसभेची निवडणूक निश्चित जिंकू, असा विश्वासही यावेळी मुंडेंनी व्यक्त केला, तसेच आपण ही निवडणूक जिंकणार आहोत, हे राष्ट्रवादीला माहित असल्याचंही गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

राज्यातील आगामीन विधानसभा निवडणुकही महायुती म्हणून लढवणार असल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलं.

मी पंढरीच्या पांडुरंगाला आणि तुळजाभवानीकडे भरपूर पाऊस येऊ दे, असं साकडं आपण घातलं असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं आहे.

दाभोळकर हत्येच्या तपासात राज्य सरकार अयशस्वी झालं आहे, म्हणून आपण दाभोळकर हत्येप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचं यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं. तसेच राज्य टोलमुक्त करण्या बाबत गोपीनाथ मुंडेंनी पुनरूच्चार केला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 16:35
First Published: Wednesday, May 14, 2014, 16:35
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?