ममता बॅनर्जी अखेर निवडणूक आयोगासमोर झुकल्या

ममता बॅनर्जी अखेर निवडणूक आयोगासमोर झुकल्या

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची स्थिती निर्माण झाली होती, मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर निवडणूक आयोगाचे आदेश मानले आहेत.

निवडणूक आयोगानं सहा अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश ममता बॅनर्जींना दिले होते.

यात सहा पोलिस अधिक्षकांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या आज सकाळी दहा वाजताच्या आत करण्यात येतील, असं ममतांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने पाच पोलीस अधीक्षक आणि एक जिल्हाधिकाऱ्याची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले होते.

पण प्रामाणिक अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचं सांगून ममता बॅनर्जींनी हा आदेश मान्य करणार नसल्याचं म्हटलं होतं.

यावर निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द करण्याची तयारी सुरू केली होती. यांनतर ममतांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 08:38
First Published: Wednesday, April 9, 2014, 08:38
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?