मोदींच्या त्सुनामीनं सेन्सेक्स उसळला, रुपयाही खणखणला!

मोदींच्या त्सुनामीनं सेन्सेक्स उसळला, रुपयाही खणखणला!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

केंद्रात नरेंद्र मोदी भाजपला मिळत असलेल्या भरघोस यशानंतर आता सेन्सेक्सनंही उसळी घेतलीय. भाजपच्या कमळाप्रमाणेच शेअर बाजारही भलताच फुललाय. शेअर बाजाराची `ओपनिंग बेल` वाजल्यानंतर सेन्सेक्सनं क्षणात एक हजार अंशांची उसळी घेतली आणि पुढच्या काही मिनिटांत बघता-बघता २५ हजाराची ऐतिहासिक पातळी गाठली. निफ्टीनंही २५० अंशांची झेप घेऊन ७४०० चा टप्पा ओलांडला.

सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत एनडीए स्पष्ट बहुमताच्या दिशेनं सुस्साट निघाल्याचं चित्र दिसलं आणि नऊ वाजता बाजार उघडला, तोच १ हजार अंशांची उसळी घेऊन. काल २३,९७१ अंशांवर बंद झालेला सेन्सेक्स थेट २४,७४४ अंशावर उघडला आणि बघता-बघता त्यानं २५ हजाराची पातळी गाठली.

`अब की बार मोदी सरकार`, हे जवळपास स्पष्ट झाल्यानं रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर दणक्यात आहेत. निफ्टीत तेल आणि नैसर्गिक वायू, बँकिंग, पॉवर, रियल्टी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसतेय.

दरम्यान, सेन्सक्ससोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाची कॉलरही `टाइट` झाली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत ६० रुपयांच्या पलीकडे गेलेला रुपया आज चांगलाच वधारला असून ५८.६२ पर्यंत येऊन पोहोचला आहे. गेल्या ११ महिन्यातील ही रुपयाची सर्वोत्तम कामगिरी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 11:52
First Published: Friday, May 16, 2014, 16:40
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?