www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमावळमधून शिवसेनेनं श्रीरंग बारणे यांना लाकसभेची उमेदवारी दिली आहे. मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत बारणेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
बारणे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेला `दे धक्का` बसला आहे. बारणे यांच्या उमेदवारीमुळे तिकिट कापले गेलेले विद्यमान खासदार गजानन बाबर यांनी थेट शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. त्यांनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय.
बाबर हे मावळमधून पुन्हा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळं त्यांनी पक्ष सोडलाय. पुढच्या वाटचालीबाबत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं बाबरांनी स्पष्ट केलंय. बाबर हे मनसेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 11, 2014, 19:36