'मनसे'च्या ठाणे-भिवंडीच्या उमेदवारांची नावं जाहीर

`मनसे`च्या ठाणे-भिवंडीच्या उमेदवारांची नावं जाहीर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोकसभा निवडणूकीसाठी मनसेनं आपल्या आणखी दोन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत...

सुरेश (ऊर्फ बाळ्या मामा) गोपीनाथ म्हात्रे यांना भिवंडी लोकसभा मतदार संघातून संधी मिळालीय तर नुकतेच शिवसेनेतून मनसेमध्ये दाखल झालेल्या अभिजीत रमेश पानसे यांना ठाण्यातून उमेदवारी देण्यात आलीय.

`एमएनएस अधिकृत` या आपल्या मोबाईल अॅप्लिकेशनवर मनसेनं आपल्या या दोन शिलेदारांची नावं जाहीर केली आहेत.

शिवसेनेच्या चित्रपट सेनेत पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीवरून सुरु झालेल्या धुसपुशीचा परिणाम म्हणून अभिजीत पानसे यांनी शिवसेनेला `जय महाराष्ट्र` करतमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी एका जाहीर कार्यक्रमात `मनसे`मध्ये प्रवेश केला होता. तेव्हा पासून त्यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हं दिसत होती. पानसे यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे आता ठाण्यात राजन विचारे - अभिजीत पानसे असा सामना रंगणार आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 15, 2014, 15:48
First Published: Saturday, March 15, 2014, 15:50
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?