मनसेला 'भोपळा', राज ठाकरेंचा 'फुगा फुटला'

मनसेला `भोपळा`, राज ठाकरेंचा `फुगा फुटला`
WWW.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये भरगच्च सभा घेतल्या. एका शहरात दोन-दोन, चार-चार सभा राज ठाकरेंनी घेतल्या, मात्र लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंना आज एकही जागा मिळतांना दिसत नाहीय.

राज ठाकरे यांनी आपल्या सभांमधून अनेकांवर टीकेचा भडीमार केलाय. मात्र राज ठाकरेंना अपेक्षित यश हाती लागतांना दिसत नाहीय. राज ठाकरे यांच्या सभांना सुरूवातीला चांगला प्रतिसाद होता, मात्र राज यांच्या शेवटच्या सभांना गर्दी ओसरतांना दिसत होती.

उद्धव ठाकरे यांचा करिष्मा मात्र राज्यात चालला आहे, असं म्हणावं लागेल कारण शिवसेना 19 जागांवर विजय मिळेल असं चित्र आहे.

मनसेला पुणे, नाशिक आणि मुंबईत एक तरी जागा मिळेल, असं म्हटलं जात होतं, पण मोदी नावाच्या वादळात ही स्वप्नही हरवून गेली आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 12:49
First Published: Friday, May 16, 2014, 12:54
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?