बीडमध्ये अखेर गोपीनाथ मुंडेंच्या मदतीला मनसे

बीडमध्ये अखेर गोपीनाथ मुंडेंच्या मदतीला मनसे

www.24taas.com, झी मीडिया, बीड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बीडचे भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस हे बीड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यापुढे आव्हान उभं केल्याची चर्चा आहे.

मनसेच्या या बिनशर्त पाठिंब्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना दिलासा मिळेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात आहे.

गोपीनाथ मुंडे यांची राज ठाकरेंशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर हा पाठिंबा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र मनसेच्या या पाठिंब्याचा मोठा फरक पडेल किंवा नाही हे सांगणे कठीण असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 19:27
First Published: Tuesday, April 15, 2014, 19:27
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?