मनसेचा मोदींना पाठिंबा, सेनेविरुद्ध रणशिंग

मनसेचा मोदींना पाठिंबा, सेनेविरुद्ध रणशिंग
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आठव्या वर्धापन दिनानिमित्त `महाराष्ट्र नवनिर्माण सेने`नं शिवसेनेविरोधातच रणशींग फुंकल्याचं दिसून आलंय. या कार्यक्रमात आपल्या भाषणात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा जाहीर केलाय. परंतु, राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या मनसेच्या पहिल्याच यादीत शिवसेनेविरोधात सात पैंकी सहा उमेदवार मैदानात उतरवल्याचं चित्र दिसून आलंय.

मनसे लोकसभेच्या निवडणुका लढवणार आहे, असं सांगत या निवडणूकीत मनसेचे निवडून आलेले उमेदवार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देणार असल्याचंही यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय.

लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना देताना नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायला हवेत, असंही राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावलंय. लवकरच मनसेची दुसरी यादी जाहीर करणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 9, 2014, 13:54
First Published: Sunday, March 9, 2014, 13:57
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?