www.24taas.com, झी मीडिया, कल्याणअवघ्या १ लाखांचे ३०० कोटी रुपये करणारा जादूगार कोण आहे?, असा सवाल करत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर तोंडसुख घेतलं. कल्याणच्या सभेत झालेल्या छोटेखानी भाषणात मोदींनी काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. अमेरिकेतल्या.... या मासिकात रॉबर्ट वडेरांबद्दल आलेल्या एका लेखाचा हवाला देऊन मोदींनी ही टीका केली.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मुंबईत बीकेसी ग्राउंडवरही आता सभा होणार आहे. या सभेच्या निमित्तानं महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणारेय. त्यामुळं सभेसाठी महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आलीय.
बीकेसीमधल्या सभेला महायुतीच्या दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. तसंच मुंबई आणि ठाणे परिसरातले लाखो कार्यकर्ते हजर राहण्याची शक्यता आहे. काल बीकेसीच्या मैदानावरच झालेल्या सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती. त्यामुळं राहुल गांधींच्या टीकेवर मोदी काय उत्तर देतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 21, 2014, 19:16