मोदींच्या धोब्याला हवीय जमीन, प्रतिक्षा निकालाची!

मोदींच्या धोब्याला हवीय जमीन, प्रतिक्षा निकालाची!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे कपडे धुणारा धोबी चांद अब्दुल सलाम याला 16 मे कधी येईल आणि कधी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल, असं झालंय. कारण, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याला गोध्रामध्ये स्वत:चं घर बनविण्यासाठी एक प्लॉट मिळणार आहे.

एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार, चांद यानं 2009 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. मोदींनी अधिकाऱ्यांना सांगून त्याला बोलावणं धाडलं होतं. यावेळी, गरिबीत दिवस ढकलणाऱ्या चांदनं घर बनविण्यासाठी जमिनीची मागणी मोदींकडे केली होती.

1970 च्या दशकात जेव्हा मोदी गोध्रामध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम पाहत होते तेव्हा चांद त्यांचे कपडे धुवून, इस्त्री करत होता. 76 वर्षीय चांदचा भाचा आता लॉन्ड्रीचं काम पाहतो. त्याच्या लॉन्ड्रीच्या जवळच आरएसएसचं कार्यालयही आहे.

चांदकडे असलेल्या कागदपत्रांवरून हे समजतं की जिल्हा प्रशासनानं लिलेसारा पंचायतीत एक प्लॉट त्याला देण्याचा निर्णय घेतलाय. गोध्राच्या बाहेर हा भाग येतो. परंतु, यामध्ये समस्या ही आहे की 20,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीची जमीन कुणालाही देण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज असते... आणि या जमिनीची किंमत आहे 2,58,800 रुपये. परंतु, यासाठी राज्य सरकारकडे यासंबंधीचा एक प्रस्ताव याआधीच पाठवण्यात आलाय. आता चांदला या पैशांची व्यवस्था करायचीय. परंतु, राज्य सरकारनं मेहेरबानी दाखवली तर ही रक्कम त्याला माफ केली जाऊ शकते.

चांदच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी या रकमेत काही सूट मिळेल असं आश्वासन त्याला दिलंय. परंतु, निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यामुळे काम थांबलंय.

नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदावर आरुढ व्हावेत, अशी चांदची इच्छा आहे... कारण, त्यामुळे मोदींना भेटण्यासाठी त्याला दिल्लीलाही जाता येऊ शकेल.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 17:16
First Published: Wednesday, May 14, 2014, 17:17
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?