हा तर मोदींकडून स्त्रियांचा अपमान- अजित पवार

हा तर मोदींकडून स्त्रियांचा अपमान- अजित पवार

www.24taas.com झी मीडिया, पुणे

नरेंद्र मोदी हे विवाहित असल्याची बातमी आल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे.

जे आपल्या विवाहाची 45 वर्षे ओळख देत नाहीत, स्वतःच्या धर्मपत्नीला मानत नाहीत, ते देशातील 50 टक्के महिलांचा अपमान करीत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदींवर केलीय

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी शनिवारी भवानीनगर येथे सभा घेतली.

मोदींवर बोलतांना अजित पवार म्हणाले, ""पंतप्रधानपदाच्या उमेदवारांनी त्यांच्या राज्यातून दरवर्षी 25 लाख गाई चरायला महाराष्ट्रात कशा येतात हे शोधावे.

अजित पवारांनी भाजपच्या काळात झालेल्या हल्ल्याचंही उदाहरण दिलं आहे. संसदेवर हल्ला यांच्याच काळात झाला, विमानाचे अपहरण यांच्याच काळात झाले. बंगारू लक्ष्मण, येडियुरप्पा यांचा भ्रष्टाचार ही यांचीच उदाहरणे आहेत, यांची जाहिरातबाजी सुरू आहे, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014, 23:56
First Published: Monday, April 14, 2014, 23:56
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?