मोदी म्हणतात... पवारांच्या पायाखालची जमीन सरकते

मोदी म्हणतात... पवारांच्या पायाखालची जमीन सरकते
www.24taas.com, झी मीडिया, सांगली

सांगली बनवूया चांगली, अशी घोषणा करत भाजपचे सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी मतं मागितली. नरेंद्र मोदींनी सांगली येथे हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी आणि संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी संयुक्त सभा घेतली.

दिल्ली ते सांगलीपर्यंत काँग्रेसने वंशवाद पसरवला आहे. हा वंशवाद किती वर्ष सहन करणार, असा प्रश्न नरेंद्र मोदींनी जनतेला विचारला. तसेच राजू शेट्टींनी शिट्टी वाजवल्यावर शरद पवारांच्या पायाखालची जमीन सरकते, अशी कोपरखळी देखील शरद पवारांवर नरेंद्र मोदींनी मारली.

स्वातंत्र्यापासून काँग्रेसने लोकांना फक्त धोका दिला. त्यामुळेच काँग्रेसचे घोषणापत्र हे धोकापत्र आहे. अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 16:10
First Published: Wednesday, April 9, 2014, 16:10
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?