कोक्राझारमधील हत्याकांडाला मोदीच जबाबदार - सिब्बल

कोक्राझारमधील हत्याकांडाला मोदीच जबाबदार - सिब्बल
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

कोक्राझारमधील हत्याकांडाला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. मोदींमुळे देशात जातियवाद फोफावणार आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते कपील सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे भाजपकडून तिखट प्रतिक्रीया व्यक्त होण्याची शक्यता आहे.

कोक्राझारमध्ये झालेल्या हिंसाचाराला भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याची टीका कपील सिब्बल यांनी केलीये. मोदींमुळे देशात सांप्रदायीक वातावरण तयार झाल्याचं ते म्हणालेत. दरम्यान, आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या हल्लात गेल्या 36 तासांत मृतांची संख्या 32 वर पोहचली असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

अद्यापपर्यंत 25 मृतदेह हाती लागले असून यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. यातील 12 मृतदेह बक्सा जिल्ह्यात आढळले आहेत. तर 14 जण जखमी झाले आहेत. 40 बोडो अतिरेक्यांनी AK-47 रायफलींनी पहाटे अंदाधुंद गोळीबार केला. याचबरोबर जवळपास 70 घरांना आगही लावली.

या हल्ल्यानंतर कोक्राझार, चिरंग आणि बाक्सा या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे. लष्करी आणि निमलष्करी दलाच्या सुमारे एक हजार जवानांना कोक्राझारमध्ये पाठविण्यात आल आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 3, 2014, 14:44
First Published: Saturday, May 3, 2014, 14:44
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?