LIVE: फेरमतदानात नगरला 1 वाजेपर्यंत 43 टक्के मतदान

LIVE: फेरमतदानात नगरला 1 वाजेपर्यंत 43 टक्के मतदान
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई/अहमदनगर

> 3 वाजेपर्यंत मुंबईतल्या मालाडमध्ये 32 टक्के मतदान

> फेरमतदानात नगरला 1 वाजेपर्यंत 43 टक्के मतदान

> 11 वाजेपर्यंत श्रीगोंद्यात 27.6 टक्के मतदानाची नोंद

मुंबईतल्या तीन तर अहमदनगरमध्ये एका ठिकाणी आज फेरमतदान सुरु झालंय. मतदानापूर्वी घेण्यात येणाऱ्या मॉक वोटींगची मतं EVM मशिनमधून उडवण्यात आली नव्हती. त्यामुळं प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतांची नोंद यंत्रात झालीय.

निवडणूक अधिकाऱ्यांना ही चूक लक्षात येताच या ठिकाणी फेरमतदान घेण्यात येतंय. मुंबईतल्या चांदिवली, चारकोप आणि मालाड तर अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदामध्ये हे मतदान होतंय. सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत हे मतदान होणार आहे.

त्यामुळं संबंधित भागातील मतदारांनी आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन केलं जात आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 27, 2014, 08:26
First Published: Sunday, April 27, 2014, 15:21
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?