मोदींचे सहकारी अमित शहांना समन्स

मोदींचे सहकारी अमित शहांना समन्स

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी महासचिव अमित शहा पुन्हा एकदा अडचणीत आलेत.

इशरत जहाँ बनावट एन्काऊंटप्रकरणी सीबीआयनं अमित शहांना दिलासा दिलाय. मात्र तुलसीराम प्रजापती बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टानं अमित शहा यांच्याविरूद्ध समन्स जारी केलंय.

येत्या 23 मे रोजी होणा-या सुनावणीसाठी अमित शहांनी हजर राहावं, असे आदेश कोर्टाने दिलेत. प्रजापती एन्काऊंटर खटला गुजरातमधून मुंबई कोर्टाकडे सोपवण्यात आलाय.

गँगस्टर सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना गुजरात पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार केले होते.

या एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या तुलसीराम प्रजापती यालाही गुजरात पोलिसांनी डिसेंबर 2006 मध्ये खोट्या चकमकीत ठार केले. तत्कालिन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा या कटात सहभाग असल्याचा सीबीआयचा आरोप आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 10, 2014, 15:04
First Published: Saturday, May 10, 2014, 15:04
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?