थो़ड्याच वेळात नरेंद्र मोदी आणि नवाझ शऱीफ यांची भेट

थो़ड्याच वेळात नरेंद्र मोदी आणि नवाझ शऱीफ यांची भेट
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

थोड्याच वेळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट होणार आहे.

नवाझ शरीफ हैदराबाद भवनाकडे रवाना झाले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज हे ही यावेळी सोबत असणार आहेत.

नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांची भेट ही भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चेचं एक नवं पर्व असल्याचं सांगण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाला त्यावेळी नवाझ शरीफ आणि नरेंद्र मोदी यांची औपचारीक भेट झाली.

मात्र आता होणाऱ्या भेटीत नवाझ शऱीफ आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा होते, यावर सर्वांचं लक्ष आहे.

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात बंदीस्त असलेले कैद्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 27, 2014, 12:35
First Published: Tuesday, May 27, 2014, 15:06
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?