www.24taas.com, झी मीडिया, वाराणसीनरेंद्र मोदींचं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल की नाही हे १६ मेला स्पष्ट होईल... पण मोदींचं फॅशन स्टेटमेंट मात्र तरुणाईमध्ये हिट झालं आहे... देशातले मोठं मोठे फॅशन ब्रँड्स आता मोदी स्टाईल कुर्ता आणि जॅकेट बाजारात आणत आहेत.
सध्या बाजारात येतेय खास मोदी स्टाईल! वेगवेगळे रंग आणि खास प्रभाव टाकणारा अंदाज.. मोदींची हीच स्टाईल आता तरुणाईला आकर्षित करतेय. मोदींचे कपडे आता एक स्टेटस् सिम्बॉल बनले आहेत.
अनेक तरुणांना मोदीचं जॅकेट इतकं आवडतंय की त्यांना आता तसंच जॅकेट तयार करुन हवंय. मोदींच्या स्टाईलचा कुर्ता आणि जॅकेट तयार करण्यासाठी असे अनेक तरुण आता दुकानांमध्ये चकरा मारत आहेत. मोदींची स्टाईल अशी हिट होतांना पाहून मोठमोठया ब्रॅन्डनी आता मोदींसारखेच कपडे बाजारात आणले आहेत. एका कंपनीनं तर मोदी स्टाईलचे १० जॅकेट सादर केलेत.
मोदी वडोदरा इथूनही निवडणूक लढवत असले तरी त्यांना वाराणसीतूनही विजय मिळवणं गरजेचं आहे. दिल्लीच्या सिंहासनावर ते वाराणसी जिंकल्यावरच शोभून दिसतील. वाराणसीचा निकाल लागण्याआधीच वाराणसीच्या लोकांना मात्र त्यांच्या फॅशन स्टेटमेंटची भूरळ पडली आहे..
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 23, 2014, 20:54