मोदींचा सत्ता स्थापनेचा दावा, 26 मे रोजी शपथ

मोदींचा सत्ता स्थापनेचा दावा, 26 मे रोजी शपथ
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. भेटीत नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी हे 26 मे रोजी सोमवारी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना एक निवेदन सादर केलं आहे, यात त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यासाठी आमंत्रण देण्यावर विचार करावा, अशी विनंती केली आहे.

राजनाथ सिंह यांनी `एनडीए`कडे 335 खासदारांचं समर्थन असल्याचं म्हटलं आहे.

राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानपदाची शपथ देण्यासाठी 26 मे रोजीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
शपथविधी समारंभात 3 हजार पाहुण्यांना बोलावलं जाणार आहे.

नरेंद्र मोदी यांची आज भाजपाकडून आज संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली.

संसदच्या सेन्ट्रल हॉलमध्ये संसदीय दलाची बैठक झाली, बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या प्रस्ताव ठेवण्यात आला, हा प्रस्ताव पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ठेवला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 20, 2014, 15:44
First Published: Tuesday, May 20, 2014, 16:03
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?