मोदी आज मुंबईत, अजित पवार जळगावात

मोदी आज मुंबईत, अजित पवार जळगावात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत सभा होणार आहे.

नरेंद्र मोदी यांची मुंबईतील सभा बांद्रा-कुर्ला संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

मुंबईत सभा घेण्याआधी मोदींची कल्याणमध्ये सभा होणार आहे. नरेंद्र मोदी यांची काल जळगावात सभा झाली..

राज्यातील तिसऱ्या टप्प्याचा प्रचार उद्या सायंकाळी थंडावणार आहे, यामुळे राज्यात दिग्गज नेत्यांनी सभांवर भर दिला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यासाठी पेणमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रावेरमधून मनीष जैन आणि जळगाव मतदार संघातून सतीश पाटील यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

अजित पवार जळगाव जिल्ह्यात आज पाच सभा घेणार आहेत. तसेच नितीन गडकरी जळगाव जिल्ह्यात आज दोन सभा घेणार आहेत.

नाशिकमध्ये आम आदमी पक्षाचे नेते विजय पांढरे यांच्या प्रचारासाठी योगेंद्र यादव, तर छगन भुजबळांच्या प्रचारासाठी सलमान खान रोड शो करणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 21, 2014, 10:02
First Published: Monday, April 21, 2014, 12:12
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?