देशात ना जवान, ना किसान सुरक्षित - मोदी

देशात ना जवान, ना किसान सुरक्षित - मोदी


www.24taas.com, झी मीडिया, वर्धा

यूपीए सरकारनं देशातला जवान संपवला आणि किसानही संपवला अशी परखड टीका राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींची गुरुवारी वर्ध्यात सभा झाली. या सभेत त्यांनी सरकारच्या कृषी धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी, मराठीतून भाषणाला सुरुवात करत मोदींनी उपस्थितांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला.

सरकारला शेतकऱ्यांची आठवण केवळ निवडणुकांपुरती येते. आर्थिक फायदा होत असतानाही कापसाची निर्यात कुणाच्या हितासाठी बंद केली असा सवालही त्यांनी पंतप्रधानांना या सभेत विचारला. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करणा-या मोदींनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देत काँग्रेस-एनसीपीचा एकही नमुना संसदेत पाठवू नका असं भावनिक आवाहन उपस्थितांना केलं. यावेळी,

काय म्हणतायत मोदी

* संपूर्ण देशात जल वाचविण्यासाठी आंदोलन केलं जाऊ शकतं... आणि पाणी वाचविणाऱ्यांनाही मोबदला दिला जाऊ शकतं...

* शेतकऱ्यांनो आत्महत्या हा यावर उपाय नाही... सरकारची योजना अशा पद्धतीनं विकसीत व्हायला हव्यात की त्यामुळे शेतकऱ्यांवर मरण्याची वेळ येऊ नये... - मोदी

* आजच्या तरुणाला शेतीचं भय वाटतंय... जर हिंदुस्थानची शेती नष्ट झाली, शेतकरी नष्ट झाले तर देशाचं पोट कसं भरेल? - मोदी

* निर्यात बंदीमुळे गुजरातच्या शेतकऱ्यांना ६० हजार कोटींचा फटका... कापूस निर्यात बंदीमुळे गुजरातच्या शेतकऱ्यांना फटका... सरकारच्या चुकीच्या धोरणामुळ शेतकरी अडचणीत... शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत - मोदी

* शरद पवारजी या शेतकऱ्यांना उत्तर द्या... कापसाचं पीक चांगलं झालं... आंतरराष्ट्रीय मागणी वाढली... शेतकऱ्यांना पैसेही मिळत होते... पंतप्रधानजी, कापसाच्या निर्यातीवर प्रतिबंध का लावले?

* देशाच्या जवानांचे शीर कापून नेले... त्यांचे शीर परत कसे आणणार? देशाची रक्षा करणाऱ्या जवानांनाही नाहक मरण्यासाठी सोडलंय... - मोदी

* सेनेचे जवान सुरक्षित नाहीत... कोणत्या तोंडानं `जय जवान`चे नारे देतात? मोदींचा सवाल

* शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यायला आलोय - मोदी

* शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज देऊ - मोदी



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 16:37
First Published: Friday, March 21, 2014, 09:00
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?