भगवान बुद्धानंही सोडलं होतं पत्नीला, मोदींची भावाकडून पाठराखण

भगवान बुद्धानंही सोडलं होतं पत्नीला, मोदींची भावाकडून पाठराखण
www.24taas.com, वृत्तसंस्था, गाझियाबाद

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सोमवारी मोदींच्या विवाहाबाबत त्यांची पाठराखण केलीय. ते म्हणाले, भगवान बुद्धानंही आपल्या पत्नीला सोडलं होतं, तेव्हा त्यांना कोणी नाही विचारलं की त्यांना का बरं हे पाऊल उचललं?.

प्रल्हाद मोदी हे गाझियाबादच्या प्रताप विहार परिसरात आपल्या मित्राला भेटायला आले होते आणि त्यानंतर ते गुजरातला परतले. तिथं पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, "भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा विवाह केला होता. आपल्या विवाहानंतर ते पत्नी आणि दोन मुलांना सोडून गेले. त्यावेळी त्यांना नाही विचारलं की आपलं कुटुंब का सोडलं आणि पत्नीला अधिकार का नाही दिले. मग हे प्रश्न मोदींना का विचारले जात आहेत."

मोदी भाजप पेक्षा मोठे झाले आहेत, या आरोपावर उत्तर देत प्रल्हाद म्हणाले, "मुलं मुलं असतात, आई-वडील, आई-वडील असतात. भाजप आई-वडिलांसारखे आहेत आणि नरेंद्र भाई त्यांच्या मुलासारखे आहेत.आमच्यासाठी पक्ष पहिले आणि नंतर नरेंद्र भाई आहेत.ते आज जे काही आहेत ते भाजपमुळेच..."


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 22, 2014, 21:31
First Published: Tuesday, April 22, 2014, 21:31
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?