www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरनरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळेल, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय. एवढच नाही तर मंत्रीपद मिळ्यानंतर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं साहित्य त्यांच्या बंगल्यातून बाहेर काढू, असं थेट इशारा आठवले यांनी दिलय.
रामदास आठवले यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलंय. काँग्रेसने मला हरविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच मंत्रिपद मिळू नये म्हणून काम केले. तसे मला पाच वर्षे टोळवल. मला सत्तेबाहेर ठेवून मला शिर्डी येथे पाठविले. त्यांच्यामुळे मी मंत्री होऊ शकलो नाही, असे ते म्हणालेत.
काँग्रेसवाले एवढ्यावरच थांबले नाही, तर मी राहत असलेल्या बंगल्यातील साहित्य बाहेर काढले. त्यामुळे मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद मिळेल. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांचे साहित्य बंगल्यातून बाहेर काढणार आहे, असे विधान त्यांनी यावेळी केले.
पाहा व्हिडिओ
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 14, 2014, 09:55