भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वैवाहिक स्थितीसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश अहमदाबादच्या स्थानिक न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
मोदींवर वैवाहिक माहिती लपविण्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली आहे. यावर सुनावणी देताना न्यायाधीश एम.एम.शेख यांनी मोदींच्या वैवाहिक स्थितीबद्दल माहिती सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
गुजरामध्ये याआधी झालेल्या सर्व निवडणूकीत मोदींनी आपल्या वैवाहिक स्थितीसंदर्भातील माहिती लपविल्याचा आरोप आपचे कार्यकर्ते निशांत वर्मा यांनी केला आणि पोलीस ठाण्यात त्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु, पोलिसांनी तक्रार दाखल करु न घेतल्याने वर्मा यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने मोदींच्या वैवाहिक माहिती देण्याबाबतचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 17, 2014, 21:33