पहिल्यांदा काँग्रेसशिवाय भाजपचं 'शुद्ध सरकार' : मोदी

पहिल्यांदा काँग्रेसशिवाय भाजपचं `शुद्ध सरकार` : मोदी
www.24taas.com, झी मीडिया, बडोदा

देशात पहिल्यांदा काँग्रेसशिवाय पूर्ण बहुमत जर कुणाला मिळालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे. हे काँग्रेसशिवाय भाजपचं शुद्ध सरकार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या विचारधारेविरोधात हा विजय मिळाला असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या प्रचंड मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी हे आभार मानायला बडोद्यात एका व्यासपिठावर आले आहेत. नरेंद्र मोदी यांची ही विजयी सभा असल्याचं सांगण्यात येत आहे. मी सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आलो आहे.

पहिला हक्क बडोद्याच्या लोकांचा आहे. बडोद्याला उमेदवारी भरल्यानंतर फक्त 50 मिनिटे देऊ शकलो आणि बडोदावासियांनी मला 5 लाखांपेक्षा अधिक मतं दिली.

नरेंद्र मोदी यांचा मताधिक्क्याचा विक्रम असल्याचं सांगण्यात येतं आहे, मोदींनीही ही शक्यता आपल्या रॅली व्यक्त केली, आणि सांगितलं, आपण 5 लाख 70 हजार 128 मतं दिली, या विक्रमाबद्दल बडोद्याच्या नागरिकांचे आभार.

मोदी पुढे म्हणाले, गुजरातमधील 26 पैकी 26 जागांवर विजय मिळवून दिल्याबददल गुजरातच्या जनतेचे आभार. प्रत्येक कार्यकर्त्याने नरेंद्र मोदी बनून काम केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 19:47
First Published: Friday, May 16, 2014, 19:47
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?