गंगा घाटावर भावी पंतप्रधानांनी केली आरती!

गंगा घाटावर भावी पंतप्रधानांनी केली आरती!
www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी

प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींची वाराणसीत जाऊन गंगा आरती करण्याची इच्छा अखेर आज पूर्ण झाली...

मोदी आज सायंकाळी वाराणसीत दाखल झाले... इथं त्यांनी दशाश्वमेघ घाटावर जाऊन गंगेची आरती केली... पूजन केलं...


माँ गंगानं माझ्यासाठी काही तरी खास निश्चित केलंय, असं म्हणत असताना नरेंद्र मोदींनी वाराणसीतल्या जनतेचे आभारही मानले....

'जी मागितल्याविनाच ताटात वाढते... ती आई असते... मला तर वारणसीच्या जनतेला काही मागण्याचीही संधी मिळाली नव्हती... मला मतदारांशी संवाद साधण्यापासून थांबविलं गेलं होतं' असं यावेळी मोदींनी म्हटलंय.

याप्रसंगी नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि अमित शाह हेदेखील उपस्थित होते.

प्रचारावेळी ते उमेदवार म्हणून गंगेची आरती करणार होते, पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. पण आज त्यांनी देशाचे भावी पंतप्रधान म्हणून गंगा आरती केली.

भावी पंतप्रधानाला पाहण्यासाठी वाराणसीही सज्ज झाली होती. वाराणसीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. गुजरातच्या स्पेशल पोलीस टीमनंही मोदी वाराणसीत ज्या-ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणांची पाहणी केलीय. साधारण पावणे पाचच्या दरम्यान मोदी वाराणसीत दाखल झाले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 17, 2014, 18:19
First Published: Saturday, May 17, 2014, 20:28
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?