www.24taas.com, पीटीआय, वॉशिंग्टननरेंद्र मोदी हे भारतातच नाही परदेशामध्येही तितकेच प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणता नेता प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स आणि शेअरिंग बघता मोदी जगात दुसऱ्या नंबरवर आहेत.
फेसबुक पॉलिसी कम्युनिकेशनचे अँडी स्टोन म्हणतात, इतर कोणतेही नेते किंवा जगातील कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा सर्वात वेगानं वाढणारं मोदींचं फेसबुक पेज आहे. (दर दिवशी, आठवडा, महिना)
७ एप्रिल २०१४ला देशातील लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा होता. तेव्हा मोदींचे फेसबुकवर १२.४६ कोटी फॅन्स होते. आज जेव्हा नरेंद्र मोदींचं नाव भारताचे भावी पंतप्रधान म्हणून नक्की झालंय. येत्या २६ मेला मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. तेव्हा आजच्या या घडीला मोदींच्या फेसबुक फॅन्सची संख्या आहे १५.२४५ कोटी.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे फेसबुकवर ४० कोटी फ्रेंड्स आहेत. तर नरेंद्र मोदी हे जगातील दुसऱ्या नंबरचे प्रसिद्ध नेते आहे.
निवडणुकांदरम्यान ही संख्या वाढली. मोदींनी अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार मिट रोमनी यांनाही मागे टाकलंय. रोमनींच्या फेसबुक फॅन्सची संख्या ११.३४५ कोटी आहे.
मोदींच्या फेसबुक पेजची वाढ ही (१.१७१%) आहे जी ओबामांच्या फेसबुक ग्रोथ रेट पेक्षा जास्त आहे. (०.३०५%). लोकसभेच्या मतमोजणीच्या दिवशी मोदींच्या फेसबुक फॅन्सच्या संख्येत सातपटीनं वाढ झाली.
भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या या काळात दोन-तृतियांश फेसबुक वापरणाऱ्या युजर्स पैकी प्रत्येक व्यक्तीमागे १० संवाद हे नरेंद्र मोदींबाबतच होते. स्टोन म्हणाले, याकाळात १३ कोटी यूजर्सचे ७५ कोटी संवाद मोदींबद्दल झाले.
निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी फेसबुकवरील जगातील दुसऱ्या नंबरचे सर्वात प्रसिद्ध असे नेते बनले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 21, 2014, 16:10