राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार जाहीर

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार जाहीर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र विधानसभेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये दोन विद्यमान सदस्यांना पुन्हा राष्ट्रवादीने संधी दिली आहे.

विधान परिषदेचे नऊ सदस्य निवृत्त होत असल्याने त्या जागा भरण्यासाठी येत्या २० मार्च रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केलेत.

तर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले आणि भाजपमध्ये दाखल झालेल्या संजयकाका पाटील यांच्या जागी ठाण्याचे आनंद ठाकूर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली.

दरम्यान, नीलम गोर्‍हे (शिवसेना), जयप्रकाश छाजेड, विनोद तावडे व पांडुरंग फुंडकर (भाजप), हेमंत टकले, किरण पावसकर, रणजितसिंग पाटील आणि संजय पाटील (राष्ट्रवादी) आणि शिवाजीराव देशमुख (काँग्रेस) हे विधान परिषदेचे विद्यमान सदस्य सहा वर्षांची मुदत संपवून येत्या २४ एप्रिलला निवृत्त होत आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 27, 2014, 13:57
First Published: Thursday, February 27, 2014, 15:56
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?