'आप'च्या दमानिया फसल्या, गडकरींची विजयाकडे वाटचाल

`आप`च्या दमानिया फसल्या, गडकरींची विजयाकडे वाटचाल
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

नागपूरमध्ये काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार आणि `आप`च्या अंजली दमानिया यांना मागे टाकत भाजपच्या नितीन गडकरींनी बाजी मारल्याचं चित्र दिसतंय.

पूर्ती घोटाळ्यात झालेल्या आरोपानंतर गडकरींची बाजू कमजोर झाल्याचं म्हटलं जात होतं. पण, आजच्या निकालानंतर मात्र या आरोपांचा फारसा परिणाम नितीन गडकरी यांच्या राजकीय आलेखावर झाला नसल्याचं स्पष्ट झालंय. 'आप'च्या नेत्या अंजली दमानिया आणि नितीन गडकरी यांचा वाद राज्यात बराच गाजला होता. नितीन गडकरी यांचा पर्दाफाश केल्याचा दावा, दमानिया यांनी केला होता.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच नितीन गडकरी आघाडीवर राहिले... सकाळी ९.१० वाजल्याच्या सुमारास नितीन गजकरींनी १०,००० मतांची आघाडी नोंदवली. पहिल्या फेरीअखेरीस ते २४,४५६ मतांनी आघाडीवर होते. अखेरच्या टप्प्यांमध्ये त्यांनी तब्बल ५७,००० मतांनी आघाडी नोंदविली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 12:05
First Published: Friday, May 16, 2014, 12:07
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?