www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबादऔरंगाबादमधून नितीन पाटील यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
कन्नडचे विधानसभा मतदारसंघाचे नितीन पाटील माजी आमदार आहेत.
यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील जाधव यांना जिंकवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
हर्षवर्धन जाधव यांनी ही निवडणूक मनसेच्या तिकीटावर लढवली होती.
नितीन पाटील यांच्यावर बँकेत बोगस भरती केल्याबद्दलही गुन्हा दाखल आहे.
काँग्रेसचे माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी नितीन पाटील यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे.
आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं उत्तमसिंह पवार यांनी म्हटलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 24, 2014, 19:25