देशात मोदींची लाट नाहीच - प्रियंका गांधी

देशात मोदींची लाट नाहीच - प्रियंका गांधी

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजप आणि आपच्या विजयाच्या दाव्यानंतर सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी यांनी देशात नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचं म्हटलं आहे.

प्रियंका गांधी यांनी मतदान केल्यानंतर प्रियंका गांधी यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली मात्र त्यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही.

पत्रकारांनी अखेर देशात मोदींची लाट आहे, तुम्हाला काय वाटतं?, मोदींच्या लहर आहे काय सांगाल?, असा प्रश्न कायम ठेवल्यावर जाता-जाता प्रियंका गांधी म्हणाल्या, "बिल्कुल नाही, काहीही नाही, मला नाही वाटतं मोदींची लहर आहे", असं उत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं आहे.

याआधी हा प्रश्न सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पत्रकारांनी केला होता, त्यावर राहुल आणि सोनिया गांधी काहीही बोलले नाहीत.

काँग्रेससाठी आतापर्यंतची ही सर्वात कठीण वेळ असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप एक चांगलं संख्याबळ उभं करेल, अशी सध्या चर्चा आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 10, 2014, 14:08
First Published: Thursday, April 10, 2014, 14:08
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?