www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसने आपला छोटासा मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी मंत्रीपद देण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे यापूर्वीचे मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी हीना गावित यांनी, नंदुरबारमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढवली.
म्हणून विजयकुमार गावित यांना राष्ट्रवादीने बाहेरचा दरवाजा दाखवला आहे. या जागी आता जीतेंद्र आव्हाड यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे.
ठाणे शहरातून मंत्री होणारे जीतेंद्र आव्हाड हे पहिलेच आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांचं मंत्रिपद काढून घेतलं जाणार आहे, अशी चर्चा होती, मात्र तुर्तास हा विषय मागे पडल्याचं सांगण्यात येतंय.
फौजिया खान यांच्या जागेवर विजयकुमार गावित यांचे भाऊ शरद गावित यांना मंत्रीपद मिळणार होते, शरद गावित हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 29, 2014, 13:59