'तर मोदींना दोर बांधून रस्त्यावर आणलं असतं'

`तर मोदींना दोर बांधून रस्त्यावर आणलं असतं`

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता

ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकेचा भडीमार केला आहे. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला ममतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मी केंद्र सरकार माझ्याकडे राहिलं असतं, तर मोदींना दोर बांधून रस्त्यावर आणलं असतं, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला हे उत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या अटकेची मागणी केली होती.

यावर नरेंद्र मोदी म्हणाले होते, मला अटक करणं एवढं सोप नाही, माझ्या अटकेसाठी ममता बॅनर्जींना दोरखंडं खरेदी करण्याची निविदा काढण्याची गरज नाही, मी स्वत: चालत जेलपर्यंत चालत जाईन. या मोदींच्या टीकेला ममता बॅनर्जी यांनी उत्तर देतांना आपण त्यांना दोर बांधून रस्त्यावर आणलं असतं असं म्हटलं आहे.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना गाढव देखिल म्हणून टाकलं आहे.

ममतांनी मोदींवर अनेक मुद्यावर हल्लाबोल केला आहे, ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्ही उदार आहोत, त्यामुळे मोदींना बांग्लादेशात प्रचार करू देतोय, नाहीतर आम्ही त्यांना एअरपोर्टवरूनच परत पाठवलं असतं. जर मोदी पंतप्रधान झाले तर देशात अंधकार होईल.

मोदींनी दंगल घडवली, त्यांना पंतप्रधान होण्याचा काहीही अधिकार नाही, मात्र त्यांनी मोदी पंतप्रधान होतील ही शक्यताही फेटाळून लावली आहे.

नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील सभांमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर चौफेर टीका केली. यानंतर या वाकयुद्धाला सुरूवात झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 13:15
First Published: Thursday, May 8, 2014, 13:15
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?