संवेदनशील मतदान केंद्रांची वेब कास्टिंगद्वारे पाहणी

संवेदनशील मतदान केंद्रांची वेब कास्टिंगद्वारे पाहणी
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाणे जिल्ह्यात यंदा प्रथमच वेबकास्टींग तंत्रज्ञानाद्वारे संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदार संघात होणाऱ्या निवडणुकासाठी शनिवारपासून अधिसूचना जाहीर झाली आहे.

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात २४ फिरती पथके नेमण्यात आली आहेत.

दोन हजार ५८९ पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. जिल्ह्य़ात १७ ठिकाणी नाकाबंदी केंद्र कार्यान्वीत करण्यात आलीय.

ठाणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात आठ विनापरवाना शस्त्र जप्त करण्यात आली तसेच ८३५ परवानाधारक शस्त्रे पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आली आहेत.

ठाणे ग्रामीण पोलिसांनीही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २ हजार ५८९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

संवेदनशील मतदान केंद्रांचे निकष ठरले असले, तरीही अद्याप ठाणे जिल्ह्य़ातील संवेदनशील मतदान केंद्र जाहीर झाले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी पी.वेळारासू यांनी शनिवारी दिली.

यंदा प्रथमच वेबकास्टिंग तंत्रज्ञानाद्वारे संवेदनशील मतदार केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. गेल्या निवडणुकीत अनुचित प्रकार घडलेली तसेच ९० टक्क्य़ांपेक्षा जास्त मतदान झालेली केंद्र संवेदनशील ठरवली जाणार आहेत.

जिल्ह्य़ात निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून १८००-२२-१९५३ हा त्याचा टोल फ्री क्रमांक आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 30, 2014, 17:00
First Published: Sunday, March 30, 2014, 20:30
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?